Latest

Aditi Rao Hydari : आदितीचा सिद्धार्थसोबतच्या रिलेशनशीपचा खुलासा, ‘बिझी शेड्युल…’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी ( Aditi Rao Hydari) आगामी 'ताज- डिव्हायडेड बाय ब्लड' (Taj Divided By Blood) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरिजशिवाय ती वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. अदितीचे नाव काही दिवसांपासून साऊथ अभिनेता सिद्धार्थ सूर्यनारायणसोबत जोडले गेलं आहे. तर दोघेजण एकमेकांना डेट करत असल्याची माहिती समोर आली होती. याच दरम्यान अदितीचे त्याच्या रिलेशनशीपबद्दलचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री अदिती राव हैदरीची 'ताज- डिव्हायडेड बाय ब्लड' ही वेबसिरीज लवकरच ओटीटीवर येणार असल्याने ती वेबसीरीच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यादरम्यान आदितीने ( Aditi Rao Hydari) एका मुलाखतीत सिद्धार्थच्या रिलेशनशीपबद्दलचा खुलासा केला आहे. 'लोकांना जे आवडते तेच करत आहेत आणि मला जे आवडते ते मी करत आहे. तुम्ही एखाद्याला बोलण्यापासून थांबवू शकत नाही. मी माझ्या आनंदात गुंग आहे आणि एका उत्कृष्ट दिग्दर्शकासोबत काम करत आहे. माझ्या कामात मी बिझी आहे. असे तिने म्हटलं आहे.

आदिती राव हैदरीच्या या मुलाखतीतून सिद्धार्थच्या रिलेशनशीपचा स्पष्टपणे उल्लेख झालेला नाही, परंतु ती तिच्या कामात बिझी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आदितीच्या या मुलाखतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर काही दिवसांपूर्वी आदिती आणि सिद्धार्थ दोघांनी एका धमाकेदार गाण्यावर डान्स केल्याने दोघांच्या रिलेशनशीप असल्याची चर्चा पसरली होती. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT