Mahima Chaudhry : महिमा चौधरी सिंगल मदर

Mahima Chaudhry
Mahima Chaudhry

पुढारी ऑनलाईन : प्रेम खूप मोठी पवित्र भावना आहे. प्रेम करणे सोपे असते. केवळ सर्वसामान्य नाही तर, सेलिब्रिटींनाही आयुष्यात प्रेम निभावण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. परदेस फेम अभिनेत्री महिमा चौधरी हिच्या खासगी आयुष्यातही अनेक चढउतार आले. सध्या ती मुलीचा 'सिंगल मदर' म्हणून सांभाळ करत आहे.

यशाच्या उच्च शिखरावर असताना महिमा टेनिसपटू लिएंडर पेसच्या प्रेमात पडली. लिएंडर आणि महिमाने सुमारे तीन वर्ष डेट केले. त्यानंतर दोघांमध्ये तिसऱ्याची एन्ट्री झाली. पेस याचे नाव मॉडेल रिया पिल्लईसोबत जोडले जाऊ लागले. एक दिवस महिमाने पेस आणि रियाला एकत्र बोलताना पाहिले. त्यानंतर महिमाने पेससोबतचे नाते तोडले.

त्यानंतर महिमाच्या आयुष्यात आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीची एन्ट्री झाली. पहिल्या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर बॉबी आणि महिमाने गुपचूप लग्न केले. २००७ मध्ये महिमाने गोंडस मुलीला जन्म दिला, पण दोघांत वाद सुरू झाले. दोघांनी २०१३ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. महिमा १५ वर्षीय मुलीचा 'सिंगल मदर' म्हणून सांभाळ करते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news