पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रतिभाशाली अभिनेत्री अदिती राव हैदरी हिला प्रतिष्ठित डिस्टिंक्टिव इंटरनेशनल अरब फेस्टिवल अॅवार्ड्स (DIAFA) २०२३ मध्ये भारतीय करमणूक उद्योगातील तिच्या योगदानासाठी अनोख्या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं आहे. दमदार परफॉर्मन्ससोबत तिने कायम प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
संबंधित बातम्या
सिनेमॅटिक क्षेत्रात योगदानासाठी अदिती राव हैदरी कायम चर्चेत राहिली आहे. DIAFA ची मान्यता ही अदितीसाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. कारण, ती केवळ तिच्या प्रतिभेचीच ओळख करत नाही तर तिचे जागतिक आकर्षण हायलाइट करते. विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीचा उत्सव साजरा करणाऱ्या या प्रतिष्ठित समारंभाने अदितीच्या मनोरंजन विश्वातील अतुलनीय योगदानाची दखल घेतली आहे.
दिग्गज इजिप्शियन अभिनेत्री फतेन हमामा यांना समर्पित, DIAFA २०२३ मध्ये जागतिक स्तरावर अनेक उद्योगांमधील दिग्गज दिसले आहेत. अदितीसोबत तुर्की सुपरस्टार बुराक डेनिज, 'द इंटरव्ह्यूअर ऑफ द फेमस' म्हणून ओळखले जाणारे ब्रिटीश-सीरियन पत्रकार अदनान अलकातेब, अल्जेरियन रॅपर आणि गायक सोलकिंग, लेबनीज स्टार्स कॅरोल समहा आणि पामेला एल किक, सौदी टीव्ही व्यक्तिमत्व एलहम अली, अदितीसह इतर प्रसिद्ध दिग्गजांचा समावेश होता.
मोरोक्कन गायक साद लामजारेड, इजिप्शियन अभिनेत्री नादिया एल्गेंडी आणि मोना झाकी, कुवैती गायक महमोद अल्तुर्की, यूएई कलाकार फातमा लुटाह, पाकिस्तानी गायक-अभिनेता अली जफर. भारतीय अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नर्गिस फाखरी यांनाही त्यांच्या आपापल्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आलं आहे.
अदिती संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडीमध्ये पडद्यावर दिसणार आहे. ती लवकरच नेटफ्लिक्सवर येणाऱ्या विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी यांच्यासोबत 'गांधी टॉक्स' या मूक चित्रपटात दिसणार आहे.