Latest

Fighter Movie : फॅन्‍सला धक्‍का..! हृतिक- दीपिकाच्या ‘फायटर’ला ‘या’ देशांमधील चाहते मुकणार

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण आगामी 'फायटर' चित्रपटामुळे ( Fighter Movie ) चर्चेत आले आहेत.  नवे पोस्टर, गाणी आणि  ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे.  जगभरात २५ जानेवारीला फायटर रिलीज होणार आहे.  दरम्यान हृतिक- दीपिकाच्या चाहत्यांसाठी एक मोठा धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता ५ देशांमध्‍ये 'फायटर' चित्रपट रिलीज होणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

संबंधित बातम्या 

व्यवसाय तज्ज्ञ गिरीश जोहर यांनी नुकतेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ५ मोठ्या आखाती देशांमध्ये 'फायटर' चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याची माहिती दिली. त्‍यांनी आपल्‍या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,  "चाहत्यांना एक धक्का बसला आहे. फायटरला मध्य पूर्व देशांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी अधिकृत बंदी घालण्यात आली आहे. फक्त यूएईने PG15 रेटिंगसह परवानगी मिळाली आहे.'

यावरून हृतिक रोशनच्या 'फायटर' चित्रपटावर आखाती देशात बंदी घालण्यात आल्याचे समजते. मात्र, यामागील अद्याप अधिकृत कारण समोर आलेले नाही. युएईमध्ये PG15 रेटिंगसह फायटर चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी  देण्‍यात आली आहे. गाेल्फ कोऑपरेशन कॉन्सिल (GCC ) मधील बहरीन, कुवैत, ओमान, कतार आणि साैदी अरेबिया  या देशांमध्‍ये फायटर चित्रपट प्रदर्शित होणार नाही. यामुळे तेथील चाहत्यांच्‍या पदरी निराशा  पडली आहे.

Fighter  चित्रपट उद्या म्हणजे, २५ जानेवारी रोजी देशात प्रदर्शित होणार आहे. यासाठी दोन दिवसांपूर्वीच ॲडव्हान्स बुंकिंगला सुरूवात झाली आहे.  ॲडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने १ कोटी तिकिटांचे विक्री केली आहे. 'फायटर' चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. हृतिक- दीपिकासोबत चित्रपटात अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांनीही भूमिका साकराल्या आहेत. चित्रपटात सशस्त्र दलांचे शौर्य, त्याग आणि देशभक्तीचे चित्रण दाखविण्यात आलं आहे. ( Fighter Movie )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT