Latest

Kriti Sanon : रोमँटिक मूडमध्ये शाहिद- क्रिती; लव्हबर्ड्ससाठी व्हॅलेंटाईनचा खास चित्रपट

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'स्त्री' आणि 'भेडिया' यासारख्या उत्तम चित्रपटानंतर प्रसिद्ध निर्माते दिनेश विजान यांनी त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाचे जोरदार शूटिंग झाले मात्र, या चित्रपटाला त्यांनी नाव दिलेलं नव्हतं. चित्रपटात बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनॉनची ( Kriti Sanon ) जोडी दिसणार आहे. या रोमँटिक चित्रपटाचे अधिकृत्त नाव आता समोर आलं आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री क्रिती सेनॉन ( Kriti Sanon ) आणि शाहिद कपूरने हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारीत आहे. या चित्रपटाचे टायटल ( नाव ) 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' ( Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya )असे आहे. यात क्रिती सेनॉन आणि शाहिद पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. हा चित्रपट 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्ताने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या नुकतेच शेअर झालेल्या एका नवीन पोस्टमध्ये शाहिद आणि क्रिती रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. हे दोघेही बॉलिवूडच्या आवडत्या स्टार्सपैकी एक आहेत. दोघेही रोम-कॉममध्ये पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

क्रितीने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर चित्रपटातील एक पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टरच्या कॅप्शनमधून तिने चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. यात तिने लिहिले की, 'या व्हॅलेंटाईन वीकमध्ये, एक अशक्य प्रेमकथेचा अनुभव घ्या. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' ९ फेब्रुवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये, मॅडॉक फिल्म्सची निर्मिती. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपट येत आहे.' या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, चित्रपटाचे शीर्षक निर्मात्यांनी ठरवलेले नव्हते. ते आता कन्फर्म झाले आहे.

या चित्रपटात शाहिद कपूर एका वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे. जो रोबोटच्या प्रेमात पडतो. तर चित्रपटात क्रितीने रोबोटची भूमिका साकारलीय. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केलं आहे. दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT