Latest

Actor Shaheer Sheikh : शाहिर शेखची मोठ्या पडद्यावर एन्ट्री; ‘दो पत्ती’ चित्रपटातून झळकणार

दिनेश चोरगे

ऑनलाईन पुढारी डेस्क : अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि काजोल यांच्या दमदार अभिनयाने परिपूर्ण असलेला 'दो पत्ती' हा आगामी चित्रपट येत आहे. या चित्रपटात एक टीव्ही स्टार शाहिर शेख दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅड फिल्ममेकर शशांक चतुर्वेदी करणार आहेत. (Actor Shaheer Sheikh)

अभिनेत्री क्रिती सेनॉन ही बॉलिवूडमध्ये कायम चर्चेत असते. आपल्या एकापेक्षा एक उत्कृष्ट चित्रपटांमुळे तिने प्रक्षेकांच्या ह्रदयात स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटविल्यानंतर आता चित्रपट निर्माता म्हणून आपले नशीब अजमवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण आता चित्रपट निर्मितीकडे वळणार असल्याचं तिने काही दिवसापूर्वी आपल्या चाहत्यांना सांगितलं होतं. तिने आपल्या 'ब्लू बटरफ्लाय' या फिल्मच्या बँनरखाली ' दो पत्ती' चित्रपट तयार होणार असल्याची घोषणा केली होती. तिच्यासह काजोलही तिच्याबरोबर चित्रपटात दिसणार असल्याचंही तिने स्पष्ट केलं होतं. आता 'या' चित्रपटाबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

'दो पत्ती' चित्रपटात होणार या अभिनेत्याची एन्ट्री

क्रिती सेनॉन आणि काजलच्या आगामी 'दो पत्ती' चित्रपटात लोकप्रिय अभिनेता शाहिर शेखही दिसणार आहे. शाहिर शेख लोकप्रिय टीव्ही अभिनेत्यांपैकी एक असणारा अभिनेता आहे. शाहिरने या चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्याचेही सांगितले जात आहे.

अभिनयाची अनेक छटा असणारे पात्र साकारायला मला खूप आवडते. कनिका एक उत्तम कथाकार आहे आणि तिच्या कथेला न्याय देण्यासाठी मी उत्सुक आहे. अशा लोकांसोबत काम करणे हा माझा सम्मान असल्याचे अभिनेता शाहिर शेख यांने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. (Actor Shaheer Sheikh)

शाहिरने इन्स्ट्राग्रामवर दिली माहिती

आपण 'दो पत्ती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करीत असल्याची बातमी अभिनेता शाहीिर शेख याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलव्दारे दिली. तसेच सर्वोत्कृष्ट कथाकारांपैकी एक असणाऱ्या कथाकार कनिका यांनी दो पत्ती हे सुंदर कथानक लिहिले आहे. 'दो पत्ती' या मिस्ट्री थ्रिलरची निर्मिती कनिका ढिल्लन, क्रिती सेनॉन आणि नेटफ्लिक्स यांनी केली आहे. 'दो पत्ती'चे शूटिंग उत्तर भारतातील डोंगराळ भागात केले जात आहे.(Actor Shaheer Sheikh)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT