Latest

Jawan : शाहरुख खानच्या ‘जवान’ची रिलीज डेट बदलली; आता ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्‍या भेटीला

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता शाहरुख खान याचा बहुचर्चित 'जवान' ( Jawan ) चित्रपटाची रिलीज डेट आज जाहीर करण्‍यात आली. याबाबतची माहिती निर्माती गौरी खान आणि शाहरूख खानने इंन्स्टाग्रामवर मोशन पोस्टर शेअर करून दिली आहे.

जवान ( Jawan ) चित्रपट हा २ जून २०२३ रोजी सिनेमागृहात भेटीस येणार होता. मात्र, आता निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट बदलली असून नवीन डेट समोर आणली आहे. 'जवान' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलून २ जून ते २५ ऑगस्ट करण्यात आली होती. आता अखेर चित्रपटाची अंतिम रिलीज डेट समोर आली आहे. निर्माती गौरी खान यांनी 'जवान' चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

साऊथ दिग्दर्शक अॅटली हे 'जवान' चित्रपटात शाहरुखसोबत बॉलिवूड अभिनेत्री नयनतारा दिसणार आहे. नयनतारा आणि शाहरुख हे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्रित स्क्रिन शेअर करणार आहेत. शाहरूख आणि नयनतारासोबत चित्रपटात विजय सेतुपती, सान्या, अल्लू अर्जुन हे कलाकारांनीही भूमिका साकारल्या आहेत. तर शाहरुख खानच्या चित्रपटात कॅमिओ रोल करताना दिसणार आहे. शाहरूखच्या 'पठाण' ने धमाकेदार कामगिरीनंतर आता जवान चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT