Latest

Pushpa २ साठी अल्लू अर्जूनने घेतलंय विक्रमी मानधन, आकडा पाहून चकीत व्‍हाल…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द राइज' चित्रपटाच्या यशानंतर 'पुष्पा -२' ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा दुसरा भाग 'पुष्पा -२' ( Pushpa २ ) चाहत्याच्या भेटीस येणार आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त नुकताचा 'पुष्पा द रुल' ( पुष्पा -२ ) या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर पाहून चाहत्यांनी पुष्पाच्या अभिनयाचे भरभरून कौतुकाचा वर्षाव केला. पुष्पाच्या पहिल्या भागा इतकाच दुसराही दमदार कामगिरी करेल, असा विश्‍वास निर्मात्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे. 'पुष्पा -२'साठी अल्लू अर्जुनने तगडे मानधन घेतले आहे.  जाणून घेवूया त्याविषयी…

एका रिर्पाटनुसार,  'पुष्पा- २' ( Pushpa २ ) चित्रपटातील सर्वच कलाकारांनी तगडे मानधन घेतले आहे. खास करून मुख्य भूमिका साकरणार्‍या पुष्पा म्हणजे अभिनेता अल्लू अर्जूनने तब्‍बल ८५ कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्‍यामुळेच अल्लू अर्जून याने पुष्पा -२ साठी विक्रमी मानधन घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Pushpa २ चित्रपटाच्‍या तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पहिल्यादा पोलिस पुष्पाला पहिल्यांदा शोधत असतात. परंतु, दरम्यान पुष्पाचा रक्ताने माखलेला आणि आठ गोळ्या लागलेल्या शर्ट सापडतो आणि सर्वांना वाटते की, पुष्पाचा मृत्यू झाला असेल. परंतु, शेवटी एका क्लिपच्या माध्यमातून वाघाला घाबरवत पुष्पा समोर येतो. ही क्लिप टिव्हीवरून सर्वत्र पसरते. यामुळे पुष्पा जिवंत असल्याची सर्वाना माहिती मिळतेय.

पुष्पा शेवटी एका त्याच्या स्टाईलमध्ये खुर्चीत बसलेला असून 'इट इज पुष्पाज रूल्स' असे म्हणताना दिसतोय. ट्रेलरदरम्यान पुष्पाचा नाकात रिंग, गळ्यात लिंबाचा हार असा काळ्या मातेचा लूकदेखील व्हायरल झाला आहे. चित्रपटासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT