Latest

Ram Setu OTT : अक्षयचा ‘राम सेतू’ ओटीटीवर कधी येणार? जाणून घ्या

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा धमोकदार 'राम सेतू' चित्रपट काही तासांपूर्वी सिनेमा गृहात रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांनी दर्जेदार मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला चाहत्याचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच काही नेटकऱ्यांनी अक्षयचा 'राम सेतू' ब्लॉकबस्टर ठरणार असल्याचे म्हटलं आहे. याच दरम्यान चाहत्यांना अक्षयचा 'राम सेतू' ओटीटी प्लॅटफॉर्मवर ( Ram Setu OTT ) कधी रिलीज होणार यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे जाणून घेवूयात…

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारचा आज म्हणजे, २५ ऑक्टोबर रोजीचा धमोकदार 'राम सेतू' हा चित्रपट लवकरच ओटीटी आणि अॅमेझॉन प्लॅटफॉर्मवर (Ram Setu OTT) रिलीज होणार आहे. परंतु, ओटीटीवर या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. तर काहीच्या मते, राम सेतू हा चित्रपट डिसेंबर महिन्याच्या शेवटीच्या आडवड्यात ओटीटीवर रिलीज होऊ शकतो. कारण, कोणताही चित्रपट सिनेमा गृहात प्रदर्शित झाल्यानंतर २ महिन्यात ओटीटीवर येत असतो.

याच दरम्यान राम सेतू चित्रपटाच्या निर्माते आणि ओटीटी यांच्यात अद्याप कोणताही अंतिम करार झाला नसल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोष कमाई केली नाही, तर हा चित्रपट लवकरच ओटीटीवर येण्याची शक्यता आहे. 'राम सेतू' हा अक्षय कुमारचा या वर्षात प्रदर्शित होणारा चौथा चित्रपट आहे. याआधी अक्षयचा 'कटपुतली' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. परंतु फार चांगली कमाई करू शकला नाही. यामुळे राम सेतू चित्रपटाकडून चाहत्याची अपेक्षा वाढली आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT