Latest

Corona Updates : १३४ दिवसांनंतर देशभरात कोरोना रुग्‍णसंख्‍या १० हजार पार

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशभरात कोरोना रुग्‍णसंख्‍येत पुन्‍हा वाढ होताना दिसत आहे. तब्‍बल १३४ दिवसानंतर देशात कोरोना रुग्‍णसंख्‍या १० हजारांपेक्षा अधिक झाली आहे, अशी माहिती आज (दि. २७) केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने दिली. देशात सध्‍या कोरोना रुग्‍णसंख्‍या १० हजार ३०० इतकी आहे. ही संख्‍या रविवार ( दि. २६) ९ हजार ४३३ इतकी होती.

रविवारी देशात १८०५ नवीन कोरोना रुग्‍णांची भर पडली. कोरोना संसर्ग दर हा ३.१९ टक्‍के इतका झाला आहे. दैनंदिन कोरोना पॉझिटीव्ही रेट ३.१९ टक्‍के इतका आहे. गेल्या २४ तासांत देशात सहा कोरोबाबाधितांचा मृत्‍यू झाला. चंदीगड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये  मागील २४ तासांत कोरोनामुळे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये दोन रुग्‍णांच्‍या मृत्यूची नोंद झाली असल्‍याचे आरोग्‍य मंत्रालयाने म्‍हटले आहे.

आरोग्‍य मंत्रालयाच्‍या वेबसाईटनुसार, देशभरात आतापर्यंत ४ कोटी ४७ लाख ५ हजार ९५३ जणांना कोरोना संसर्ग झाला. यातील ९८.७९ टक्‍के लोक पूर्ण बरे झाले. तर १.१९ टक्‍के कोरोनाबाधितांचा मृत्‍यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाच्‍या २२०.६५ कोटी डोस देण्‍यात आले आहेत.

मागील सात दिवसांमध्‍ये कोरोनाबाधितांच्‍या संख्‍येत वाढ

गेल्या सात दिवसांत कोरोना रुग्‍णसंख्‍येत ७८ टक्‍के वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या आठवड्यात म्हणजेच १९ ते २५ मार्च या कालावधीत देशभरात ८ हजार ७८१ नवीन कोरोना रुग्‍ण आढळले. यापूर्वी 12 ते 18 मार्च दरम्यान देशात 4929 बाधित आढळले होते, अशी माहिती केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने दिली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT