Latest

‘एनआयए’ची PFI विरोधात धडक कारवाई; चार राज्यांमध्‍ये छापेमारी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : राष्‍ट्रीय तपास संस्‍था (NIA) आज (दि.२५) पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया ( PFI) या संघटनेविरोधात देशातील चार राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोवा या राज्यांमध्‍ये एनआयएने धडक कारवाई (Action by NIA) केली आहे.

एनआयए तपास संस्थेने आज सकाळी चार राज्यातील १७ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये बिहारमधील १२ ठिकाणी, उत्तर प्रदेशातील दोन ठिकाणी आणि पंजाबमधील लुधियाना आणि गोव्यात प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश (Action by NIA) असल्‍याचे वृत्त 'एनआयए'ने दिले आहे.

एनआयएने सोमवारी देशभरातील पीएफआय तळांवर छापे टाकले. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील उर्दू बाजार येथील दंतचिकित्सक डॉ. सारिक रझा यांच्या घरावर एनआयएने छापा टाकला आहे. सिंगवाडा पोलीस ठाण्यांतर्गत शंकरपूर गावात राहणाऱ्या मेहबूबच्या घरावरही पीएफआय लिंक्स प्रकरणी छापा टाकण्यात आला.

या छापेमारी विषयी माहिती देताना एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीएफआय शी संबंधित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई (Action by NIA) करण्यात आली आहे. यापूर्वी पीएफआय या संघटनेवर कारवाई (Action by NIA) करण्यात आली आहे. यानंतर पीएफआयच्या १०८ नेते आणि सदस्यांच्या अटकेनंतर केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये PFI वर व सहयोगी संघटनांवर बंदी घातली होती.

केंद्र सरकारकडून PFI वर बंदी

केंद्र सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पीएफआयवर पाच वर्षांसाठी बंदी घालणारी अधिसूचना जारी केली होती. पीएफआयवर ISIS सारख्या जागतिक दहशतवादी संघटनांशी संबंध, दहशतवादी फंडिंग आणि हिंसक कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.

बंदीवर UAPA न्यायाधिकरणाचा शिक्कामोर्तब

PFI वर बंदी घालण्याच्या निर्णयाला बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा (UAPA) न्यायाधिकरणाने मान्यता दिली आहे. यूएपीए कायद्यानुसार या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. न्यायाधिकरणाचे नेतृत्व करणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी पीएफआयवरील केंद्राची बंदी कायम ठेवली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT