Latest

‘द्रुतगती’वर अपघात घटले ; गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी कमी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर होणार्‍या अपघातात यंदा 30 टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे. महामार्ग पोलिसांनी केलेल्या नोंदीवरून हे स्पष्ट होत आहे. जानेवारी ते जून 2022 या सहा महिन्यांच्या कालावधीत यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर (एक्सप्रेस वे) 100 अपघात झाले होते. यंदा जानेवारी ते जून या कालावधीत फक्त 70 अपघात झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या सहा महिन्यांच्या तुलनेत यंदा अपघातांमध्ये 30 टक्क्यांनी घट होत असल्याची नोंद महामार्ग पोलिसांनी केली आहे.

आकडे काय सांगतात…(जानेवारी ते जून)

वर्ष अपघात मृत्यू गंभीर जखमी
2022 100 40 67 12
2023 70 37 54 19

या झाल्या उपाययोजना
मुंबई वाहिनीवर कि. मी. 36 ते कि. मी. 39 या ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी चालू असलेल्या मिसिंग लेन प्रोजेक्टअंतर्गत चौथ्या लेनचे काम हे अ‍ॅफकॉन कंपनीशी समन्वय साधून लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात आले.

ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी दिवे लावण्यात आले. तसेच रंबलर स्ट्रीप, साईन बोर्ड यांचे प्रमाण वाढविण्यात आले.
घाटांमधील सिमेंट क्रॅश बॅरिअरची अर्धवट कामे पाठपुरावा करून पूर्ण करून घेण्यात आली.

28 हजार 576 वाहनांवर कारवाई
वाहनांच्या वेगावर नियंत्रण व अपघात याप्रकरणी वाहनचालकांवर यावर्षी जून अखेर 28 हजार 576 खटले दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी जून अखेर 24 हजार 867 केस करण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT