Latest

Abdul Razzaq on Aishwarya Rai : ऐश्वर्या रायबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा माफीनामा

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जाहीर माफी मागितली आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान रझाकने विश्वचषकातील पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना ऐश्वर्या राय बच्चनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी रोष व्यक्त केला होता. (Abdul Razzaq on Aishwarya Rai)

संबंधित बातम्या : 

आयसीसी विश्वचषक २०२३ मधील पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रवास संपला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ आठ गुणांसह पाचव्या स्थानावर कायम आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघ मायदेशी परतला. सध्या कर्णधार बाबर आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) हे दोघेही पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंच्या निशाण्यावर आहेत. एका शोमध्ये पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकने विश्वचषकातील पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना ऐश्वर्या राय बच्चनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याच्याबद्दल सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. (Abdul Razzaq on Aishwarya Rai)

त्या शोमध्ये रजाकसोबत शाहिद आफ्रिदी, उमर गुल यांसारखे माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. स्टेजवर उपस्थित इतर माजी क्रिकेटपटूही रझाकच्या कमेंटवर हसताना दिसले. रज्जाक म्हणाला, 'संघाला चांगली कामगिरी करण्यासाठी इरादे योग्य असले पाहिजेत. जर तुम्हाला वाटत असेल की मी ऐश्वर्या राय बच्चनशी लग्न करावे आणि आदर्श मुले व्हावीत, तर तसे होणार नाही. तुम्हाला तुमचा हेतू आधी बरोबर सेट करावा लागेल. रज्जाकने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करताना हे वक्तव्य केले होते. चाहत्यांनी मात्र त्याच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

रझाकने मागितली माफी

माजी खेळाडू आणि चाहत्यांनी रझाकच्या टिप्पण्यांबद्दल संताप व्यक्त केल्यानंतर अखेर त्याने माफी मागितली आहे. तो म्हणाला की, "आम्ही क्रिकेट कोचिंग आणि हेतूंबद्दल बोलत होतो. माझी जीभ घसरली आणि चुकून ऐश्वर्या रायचे नाव घेतले. मी तिची वैयक्तिक माफी मागतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता."

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT