Latest

केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप आमदारांचा दिल्ली विधानसभेत गदारोळ

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप आमदारांनी दिल्ली विधानसा सभागृहात घोषणाबाजी करत गदारोळ घातला. यामुळे सभागृह १ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

दिल्लीतील मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या आमदारांनी आज विधानसभा सभागृहात घोषणाबाजी केली. आमदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येऊन मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज सुरूवातीला १५ मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्याने १  एप्रिलपर्यंत सभागृह तहकूब करण्याची घोषणा केली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT