Latest

कॅमेरे नसल्याने ‘आप’ने पत्रकार परिषद केली रद्द

backup backup

पुणे, पुढारी वृत्तसेवा : वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे नसल्यामुळे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी चक्क पत्रकार परिषद रद्द केल्याची घटना शुक्रवारी (दि. १६) घडली. त्यांच्या या वर्तणुकीमुळे प्रसारमाध्यमातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संजय सिंह गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले होते. त्यापूर्वी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात दुपारी ४ वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार असल्याचे निमंत्रण पक्षातर्फे अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपवरून देण्यात आले होते.

विशेष म्हणजे दुपारी 3 वाजून ५६ मिनिटांनी पत्रकार परिषदेची आठवणही करुन देण्यात आली. पत्रकार परिषदेच्या पूर्वतयारीसाठी नियोजित वेळेआधीच 'आप'चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सभागृहात उपस्थित झाले. यावेळी पत्रकार परिषदेसाठी प्रमुख वृत्तपत्र संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास झाल्यानंतरही पत्रकार परिषद सुरू न झाल्याने त्याबाबत विचारणा करण्यात आली. शेवटी आपच्या पदाधिकार्‍यांनी ४.४५ वाजता, दूरचित्रवाणीचे प्रतिनिधी दिसत नसल्याचे कारण देत पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती दिली. त्यावर उपस्थित पत्रकार आणि आपच्या पदाधिकार्‍यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT