Latest

Ira Khan :आमिर खानची मुलगी डिप्रेशनच्या गर्तेत; म्‍हणाली,”कधी कधी खूप रडावंही वाटतं…”

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमिर खानची मुलगी आयरा खान अनेकदा तिच्या मानसिक आरोग्याबद्दल आणि गुंतागुंतांबद्दल सोशल मीडियावर स्‍पष्‍ट बोलत असते. मानसिक आरोग्याबाबत अनेकदा ती लोकांनाही जागरुक करत असते; पण तिच पुन्‍हा सध्या डिप्रेशनच्या गर्तेत गेली आहे. याविरूद्ध झुंज देत असलेल्या आयराने तिची ही समस्या चाहत्यांसमोर उघडपणे बोलून दाखवली आहे. तिने इन्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये मानसिकतेबरोबर शारीरिक त्रास होत असल्याचे तिने म्‍हटलं आहे. तसेच यातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नसल्याची खंत आयरा खानने व्‍यक्‍त केली आहे.

आयराने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने सांगितले आहे की, तिला 'चिंताग्रस्त झटके' येऊ लागले आहेत. मला कधी नर्व्हस वाटतं तर कधी मी आनंदात असते. कधी कधी तर मला खूप रडावंही वाटतं. यापूर्वी मला कधीही चिंताग्रस्तेचा झटका आला नाही. ज्यापर्यंत मला समजले आहे, डिप्रेशनमध्ये मानसिक बरोबर हृद्याची धडधड वाढणे, श्वासची गती वाढणे, रडू येणे यासारखी शारीरिक लक्षणं देखील दिसतात. ही हळूहळू वाढत जातात. पॅनिक अटॅक कसा असतो हे मला माहीत देखील नव्हते; पणही खरोखरच विचित्र भावना आहे. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले आहे की, जर हे नियमित झाल्यास मला माझ्या डॉक्टर/मानसोपचारतज्ज्ञांना सांगावे लागेल.

पुढेही ती म्हणते, यामुळे मला खूपच असहाय्य वाटतंय. मला झोपायचे असते; परंतु मला झोप येत नाही. कारण हे चिंतेचे झटके थांबतच नाहीत. मी माझी भीती ओळखण्याचा प्रयत्न करते, स्वतःशी बोलतो, पण जर हा झटका एकदा येऊन आदळला की, मला हे थांबवण्याचा मार्गच सापडत नाही. पण Popeye शी बोलल्याने आणि दीर्घ श्वास घेतल्याने मला खूप आराम मिळतो, असेही तिने म्‍हटलं आहे.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT