Latest

aai kuthe kay karte : संजनाचा जबरदस्त लूक व्हायरल (video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

आई कुठे काय करतेमधून (aai kuthe kay karte ) संजना म्हणजेच रुपाली भोसले हिने काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. तिच्या एका नव्या प्रोजक्टवर काम सुरू आहे. ती एका मराठी गाण्यात दिसणार आहे. आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरील प्रत्येक कलाकाराची चाचणी करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या मालिकेतून रुपाली भोसले संजनाची भूमिका साकारलीय. तिला या नावानेच प्रसिध्दी मिळालीय. आता तिचा इन्स्टावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती नऊवारी साडीत दिसते. (aai kuthe kay karte )

पोरी तुझ्या नादानं हे गाणे तिच्या व्हिडिओला वाजत आहे, पांढऱ्या रंगाच्या सुंदर नऊवारी साडीमध्ये ती दिसत असून या व्हिडिओत तिचा साजशृंगार दिसत आहे. या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसते. आई शपथ अप्सरा दिसतेय, अशी कमेंट एका युजरने तिला या व्हिडिओत दिलेली दिसते. खूप खूप सुंदर आई प्रेमळ दिसतेस ❤? अशी कमेंट दुसऱ्या एका नेटकऱ्याने दिलीय. आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय-हजारो वर्षांनंतर पृथ्वीवर कधीतरी तुझासारखी एखादी अप्सरा जन्म घेते.. जिला एकदा पाहीले की सारखच पहात रहावस वाटते.. देवाने तुला खुपच फुंदर बनवलं आहे.

काही दिवसांपूर्वी तिने आपले पिवळ्या रंगाच्या साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या साडीत ती आकर्षक आणि खूप सुंदर दिसते.

होम आयसोलेशनमध्ये संजना

या मालिकेत संजनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रुपाली भोसलेला कोरोनाची लागण झालीय. तिने ही माहिती इन्स्टा स्टोरीवरुन दिली होती. रुपाली भोसले सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. ती घरातचं क्वारांटाईन झाली आहे. "सर्व काळजी घेऊन ही माझी टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. मी लवकरच यातून बरी होईन, प्लीज सगळ्यांना काळजी घ्या, मास्क लावा आणि शक्य असले तर घरीच राहा." अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना काळजी घ्यायला सांगितली आहे.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT