Latest

भंडारा : पतंगाच्या नायलॉन मांजाने चिरला गळा; युवक गंभीर जखमी

अनुराधा कोरवी

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : लाखांदूर शहरातील एका युवकाचा दुचाकीने घराकडे परतत असताना पतंगाच्या नायलॉन मांजाने गळा चिरला. यात तो गंभीररित्या जखमी झाला. ही घटना गुरूवारी (दि. २६ जानेवारी) रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास टी पॉईंट चौकातील वनविभाग कार्यालयासमोर घडली. रुद्रक तुळशीदास तोंडरे ( वय १६, रा. लाखांदूर प्लॉट) असे जखमी युवकाचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, रुद्रक तोंडरे हा घटना गुरूवारी वडिलांना पाणीपुरी खायला जातो असे सांगून टी-पॉईंट चौकात आला होता. त्यानंतर तो दुचाकीने घराकडे परत जात असताना तुटलेल्या पतंगाचा नायलॉन धागा त्याच्या गळ्यावर आल्याने त्यात गळा चिरला. यावेळी वन विभागाचे वनरक्षक एस. जी. खंडागळे यांच्या ही बात लक्षात येताच त्यांनी त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेत रुद्रक गंभीर जखमी झाला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT