Latest

जिंतूर : हातावर मराठा आरक्षण लिहित तरुणाने जीवन संपवले; वाघीतील घटना

अनुराधा कोरवी

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या सगे सोयरे अध्यादेश काढूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे हातावर व पायावर 'मराठा आरक्षण' असे लिहून तरूणाने जीवन संपवले. ही घटना बुधवारी ( दि. २० मार्च ) रोजी तालुक्यातील वाघी ( धा ) येथे घडली आहे.

संबंधित बातम्या 

याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा येथील २५ वर्षीय तरुण गजानन लिंबाजीराव बोराडे हा मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी होता. यामुळे आपल्या समजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत असे. यातच राज्य सरकारकडून सगे- सोयरे कायद्याची अंमलबजावणी तातडीने होत नसल्याने आपण स्वतःचे जीवन संपवत असल्याचे हाता-पायावर लिहून संबंधित तरूणाने शेतात जीवन संपवले.

या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे सपोनी प्रभाकर कापुरे, पोलीस हवालदार वसंत वाघमारे, सुनीलकुमार वासलवार, अमलदार शेख जीलानी यांनी घटनास्थळी दाखल होत त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT