[visual_portfolio id="314837"]
पुढारी ऑनलाइन डेस्क : पंजाबच्या मोहालीमध्ये Mohali Incident 'स्विंग' (जत्रेतील गोल झोका) तुटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अवघ्या तीन सेकंदात 50 फूट उंचीवरून हा 'स्विंग' पडला. त्यात 30 जण होते. सगळ्यांनाच दुखापत झाली. यामध्ये 13 जण गंभीर जखमी आहेत. या सर्वांना सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वास्तविक, मोहालीच्या फेज-आठ दसरा मैदानात जत्रा सुरू आहे. तिथे ही घटना काल रविवारी (दि. 4) रात्री 9 वाजता घडली.
Mohali Incident या ड्रॉप टॉवर स्विंगची (गोल झोक्याची) हायड्रोलिक कॉइल खाली पडल्याने तुटल्याचे कारण समोर आहे. प्राथमिक तपासात ही त्रुटी समोर आली असली तरी अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. त्याचबरोबर या अपघातामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मेळा आयोजित करण्यास मंजुरी दिल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुरक्षेसंदर्भातील व्यवस्था पूर्ण होते की नाही हे तपासण्याचेही कष्ट घेतले नाही.
ड्रॉप टॉवर झोका जगात सर्वात जास्त धोकादायक मानला जातो. त्यामुळे हा स्विंग चालविण्यासाठी कठोर मानक आहेत. दसरा मैदानावर आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळेच अपघातानंतर लोकांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेचीही सोय झाली नाही. आपत्कालीन क्रमांक देखील प्रदर्शित केले गेले नाहीत. प्रथमोपचाराची सोय नव्हती.
Mohali Incident पार्किंगचे व्यवस्थापन केले नाही, पोलिसांची गाडी यायला लागली 15 मिनिटे
रवींद्र सिंह यांनी सांगितले की, ते कुटुंबासह जत्रेत आले होते. कार्यक्रमस्थळी पार्किंगची योग्य व्यवस्था नव्हती. पोलिसांचे वाहन घटनास्थळी पोहोचण्यास 15 मिनिटे लागली. यामुळे लोक आणखीनच संतापले. पोलिस घटनास्थळी पोहोचताच लोकांचा गोंधळ उडाला. तो सतत पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करत होता पण तुम्ही यायला उशीर केला, असे लोक म्हणाले. पोलिसांनी मोठ्या कष्टाने त्यांना शांत केले.
Mohali Incident मैदानात आगीची एकही गाडी नव्हती
दसरा मैदानात झालेल्या जाळपोळीच्या घटनेला तोंड देण्यासाठी अग्निशमन दलाचे एकही वाहन नव्हते. अशा स्थितीत प्रशासनाने जत्रेला मंजुरी देऊनही तेथे व्यवस्था पूर्ण आहे की नाही, याची पाहणी केली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Mohali Incident असा घडला घटनाक्रम…
हे ही वाचा: