Latest

Japan PM Fumio Kishida | जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला, थोडक्यात बचावले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japan PM Fumio Kishida) यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. वाकायामा शहरात भाषणादरम्यान ही घटना घडली असून यातून ते सुखरूप बचावले आहेत. १५ एप्रिल रोजी वाकायामा शहरात संबोधित करताना त्यांच्याजवळ एक पाईप सारखी वस्तू फेकण्यात आली. ही वस्तू स्मोक अथवा पाईप बॉम्ब असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेबाबतचे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने जपानी मीडियाच्या हवाल्याने दिले आहे.

घटनास्थळी स्फोटासारखा आवाज ऐकू आला, असे वृत्त पब्लिक ब्रॉडकास्टर NHK ने दिले आहे. यानंतर लगेच फुमियो किशिदा यांना सुरक्षा कवच पुरवल्याने ते या हल्ल्यातून बचावले आहेत. ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओंमध्ये अधिकारी एका व्यक्तीला हटवताना दिसत आहेत. फुमियो किशिदा यांनी पश्चिम जपानी शहरातील बंदराचा दौरा केला. त्यानंतर भाषण सुरु करताच त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे NHK ने वृत्तात म्हटले आहे. (Japan PM Fumio Kishida)

पोलिसांनी म्हटले आहे की त्यांनी एका संशयितास अटक केली आहे ज्याने पंतप्रधान किशिदा फुमियो यांच्याजवळ स्मोक बॉम्ब फेकला. स्थानिक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान किशिदा यांनी वाकायामा प्रांतातील साईकाझाकी बंदराला भेट दिली होती. त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच त्यांच्याजवळ स्मोक बॉम्ब फुटला, असे NHK ने वृत्तात म्हटले आहे. संशयित हा एक तरुण असून त्याने कथितरित्या स्फोटक फेकले, असे NHK ने पुढे नमूद केले आहे.

माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या झाल्यानंतर नऊ महिन्यांनंतर ही घटना घडली आहे. शिंजो आबे यांच्या हत्येने देशाला धक्का बसला होता आणि त्यानंतरच्या तपासात आबे यांच्या सुरक्षेमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे जपानच्या पोलीस सुरक्षा उपाय मजबूत करण्यात आले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT