Latest

औरंगाबाद : पाडळी शिवारात शीर नसलेला मृतदेह आढळला

अनुराधा कोरवी

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाडळी शिवारातील एका शेतामध्ये शिर विरहीत मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे पैठण उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, बिडकीन पोलीस ठाण्याच्या सपोनि संतोष माने यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. मृतदेह बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव संदीप संपतराव गायकवाड (रा. पाडळी, ता.पैठण) असे आहे. खून झालेल्या व्यक्तीवर बिडकीन पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुण्याची नोंद आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पाडळी शिवारातील एका शेतामध्ये मृतदेह असल्याची माहिती शुक्रवारी (दि.२० रोजी ) काही ग्रामस्थांनी बिडकीन पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष माने यांना दिली. यानंतर त्यांनी तात्काळ सदरील घटनेची माहिती वरिष्ठांना देत आणि घटनेच्या गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्यासह विविध पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल झाले. सदरील घटनेसंदर्भात मयताचा भाऊ प्रवीण संपत गायकवाड याच्याकडून तक्रार दाखल करून घेण्याची प्रक्रिया पोलीस उपनिरीक्षक घुगे यांनी सुरू केली आहे.

या घटने गांभीर्य ओळखून ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार घटनास्थळाची पाहणी करून तपासासंदर्भात पोलिसांना सूचना दिले आहे. बिडकीन पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून सदरील खून पूर्व वैमनस्यातून झाला आहे की, कोणते तरी अन्य काही कारणाने करण्यात आला आहे याचा तपास पोलिस करत आहेत. यासंदर्भात बिडकीन सपोनि. संतोष माने यांच्यासह गुन्हे शाखेचे पथकाने तपास सुरू केला आहे. खून झालेल्या व्यक्तीवर बिडकीन पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

शिर विरहीत मृतदेह

दरम्यान, खून झालेल्या संदीप गायकवाड याचे शीर घटनास्थळी सापडत नसल्यामुळे सदरील शीर शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. घटनास्थळाजवळील आजूबाजूच्या झाडे- झुडप्यात शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT