Latest

Gay Couple : डेटिंग साइटवरील भेटीनंतर तेलंगणातील गे कपलनं थाटामाटात केलं लग्न!

दीपक दि. भांदिगरे

हैदराबाद; पुढारी ऑनलाईन डेस्क

तब्बल एक आठ वर्षापासून रिलेशनशीपमध्ये असणाऱ्या तेलंगणामधील गे कपल म्हणजेच समलैंगिक पुरुषांनी (Gay Couple) नुकतेच थाटामाटात लग्न केले. हे लग्न देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. या कपलने लग्नानंतर आनंद व्यक्त करत त्यांच्या लग्नासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसल्याचा संदेश दिलाय. तेलगंणामधील हे पहिले गे कपल ठरले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नात त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी उपस्थित होती. त्यांच्या आशीर्वादाने दोघांनी लग्नगाठ बांधली आहे.

अभय डांगे (वय ३४) आणि सुप्रियो चक्रवर्ती (३१) अशी त्यांची नावे आहेत. जरी समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचा निकाल २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी भारतात, समलिंगी जोडपे कायद्यानुसार त्यांच्या विवाहाची नोंदणी करू शकत नाहीत. भारतीय दंड संहितेतील ३७७ कलम अवैध ठरवत समलैंगिकता गुन्हा नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे देशात दोन समवयस्क व्यक्तींमधील लैंगिक संबंध गुन्हा नाही. न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे समलैंगिक समुदायाला मोठा दिलासा मिळाला होता.

एका वृत्तानुसार, सुप्रियो आणि अभय यांनी १८ डिसेंबर रोजी आयोजित सोहळ्यात एकमेकांना अंगठी घातली. हा सोहळा हैदराबाद जवळ पंजाबी आणि बंगाली पंरपरेनुसार पार पडला. लग्नापूर्वी मेहंदी आणि हळदी कार्यक्रमही झाला. या गे कपलची (Gay Couple) डेटिंग ॲपच्या माध्यमातून आठ वर्षापूर्वी ओळख झाली होती. अभयला भेटल्यानंतर एका महिन्यानंतर सुप्रियोने त्याच्या आईशी ओळख करून दिली होती. 'या नात्याबद्दल आईला आश्चर्य वाटले. पण तिने मनापासून आम्हाला स्वीकारले,' असे सुप्रियाने म्हटले आहे. "समलिंगी पुरुष म्हणून स्वीकार करण्याचा आमचा प्रवास फारसा अवघड नव्हता. एकदा का तुम्ही लोकांसमोर आलात आणि त्यांनी तुम्हाला स्वीकारले की, तुमचा आत्मविश्वास वाढतो," अशी भावना सुप्रिया यांनी Humans of Hyderabad कडे बोलताना व्यक्त केली आहे. Humans of Hyderabad हे शहरातील रहिवाशांच्या स्टोरी देणारे एक लोकप्रिय पेज आहे.

या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT