Latest

पुणे : चाकण मधील मर्सिडीज कंपनीत शिरला बलदंड बिबट्या, कामगारांना तातडीने काढले बाहेर

अमृता चौगुले

चाकण: पुढारी वृत्तसेवा

चाकण औद्योगिक वसाहती मधील मर्सिडीज बेंझ कंपनीत सोमवारी (दि. २१) पहाटे पाचच्या सुमारास बिबट्या शिरला असून, कंपनीतील सर्व कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आले आहे. पोलीस व वन विभागाकडून कंपनीत बचाव अभियान सुरू करण्यात आले आहे.

सोमवारी पहाटे मर्सिडीज कंपनीच्या सीसीटिव्ही मध्ये सर्वप्रथम हा बिबट्या कंपनीत शिरल्याचे निदर्शनास आले. हा बिबट्या कंपनीत नेमका कुठून आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंपनीत पिंजरा लावण्यात आलेला असल्याचे मर्सिडीज बेंझ कंपनीचे अधिकारी सारंग जोशी यांनी सांगितले.

सकाळी अकरा पर्यंत कंपनीत बिबट्या पकडण्यात यश आलेले नव्हते. बिबट्याच्या फोटो वरून हा पूर्ण वाढ झालेला बलदंड बिबट्या असल्याची बाब समोर आली आहे. कंपनीत बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

कंपनीच्या आतील भागात बिबट्याचा फेरफटका

कंपनीच्या आतील भागात असलेल्या सीसी टीव्हीमध्येही बिबट्या कैद झाला आहे.
मर्सडीज बेंझ कंपनीतील आणखी एका विभालाही या बिबट्याने भेट दिली.
SCROLL FOR NEXT