Latest

EVA Air Flight | प्रवाशाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : बँकाँक येथून ब्रिटनला जाणाऱ्या ईव्हीए एअर (EVA Air Flight) विमानाला (BR67) शुक्रवारी हिथ्रो विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. कारण एका प्रवाशाने विमानाच्या स्वच्छतागृहात जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. 'द मेट्रो'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार, विमानाच्या लँडिंग दरम्यान केबिन क्रूला समजले की स्वच्छतागृहात एक प्रवासी आहे. जेव्हा त्यांनी तपासणी केली तेव्हा त्यांना एक प्रवासी अशा अवस्थेत दिसून आला की त्याने स्वच्छतागृहात जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.

पण, प्रवाशाची ओळख अथवा त्याने जीवन संपविण्याचा का प्रयत्न केला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही. विमानात उपस्थित असलेले डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रवाशावर प्राथमिक उपचार करून त्याचा जीव वाचवला. स्थानिक वेळेनुसार, विमानाचे संध्याकाळी ७.३० वाजता लँडिग झाले. तेथे प्रवाशाला रुग्णालयात नेण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी आधीच उपस्थित होते.

प्रवाशांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण EVA Air ने या घटनेची पुष्टी केली आहे. पण इतर कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही. (EVA Air Flight)

या वर्षाच्या सुरुवातीला अशाच एका घटनेमुळे विमानाचा मार्ग बदलावा लागला होता. जानेवारीमध्ये ब्रिटनहून स्पेनला जाणाऱ्या रयान एअरच्या विमानाला प्रवाशांदरम्यान झालेल्या भांडणामुळे अनपेक्षितपणे पोर्तुगालमध्ये उतरावे लागले होते. एका वृत्तानुसार, मद्यधुंद अवस्थेत असलेला पुरुषांचा एक गट विमानात महिला प्रवाशांना त्रास देत होता. जेव्हा एका फ्लाइट अटेंडंटने त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा परिस्थिती आणखीन बिघडली. पण अनियंत्रित प्रवाशांनी त्याला बेशुद्ध केले. यामुळे कॅप्टनला इशारा देऊन विमानाचा मार्ग बदलावा लागला होता. प्रवाशाने सांगितले की त्या गटाने कॅप्टनच्या इशाऱ्याकडे लक्ष दिले नाही आणि २० मिनिटे हा वाद सुरू राहिला. या सर्व प्रकारानंतर पुढच्या २० मिनिटांत विमान पोर्तुगालमध्ये लँड झाले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT