Latest

Sachin Tendulkar : दिव्यांग क्रिकेटपटूचा क्रिकेटच्या ‘देवा’ने असा केला सन्मान

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयएलपीएल (इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग) या क्रिकेट स्पर्धेला सुरूवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना अमिताभ बच्चन यांच्या मालकीच्या मुंबई माझी आणि अक्षय कुमारच्या श्रीनगर के वीर यांच्यात खेळवण्यात आला. या लीगच्या उद्घाटन सोहळ्याला भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर उपस्थित होता. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी सचिनने पॅरालिम्पिक क्रिकेटपटू आमिर हौसेन आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा हजोरो क्रिकेटप्रेमींनी भरलेल्या मैदानात त्याचा सन्मान केला. (Sachin Tendulkar)

यावेळी बोलताना सचिन म्हणाला, "आमिरला आयएसपीएलचा पहिला चेंडू टाकणे हे माझे स्वप्न होते. आमिर प्लीज इकडे ये. मी तुम्हा सर्वांना आमिरचे सन्मान करण्याची विनंती करतो. आमिर हुसैन हा दिव्यांग क्रिकेटपटू आहे. तो पायाने गोलंदाजी करतो आणि मानेने फलंदाजी करतो. काही दिवसांपूर्वी त्याचा सचिनसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (Sachin Tendulkar)

सचिन तेंडुलकरने X वरील ट्विटमध्ये म्हटले की, आमिरने अशक्य ही शक्य करून दाखवले आहे. या व्हिडिओने मला स्पर्श केला आहे. यावरून त्याला क्रिकेट खेळाबद्दल किती आवड आणि प्रेम आहे हे दिसून येते. लाखो लोकांना खेळासाठी प्रेरित करण्यासाठी शुभेच्छा.
जम्मू-काश्मीरच्या बेजबहारा गावाचा रहिवाशी असलेल्या आमिरला वडिलांच्या सॉ मिलमध्ये (लाकूड कापण्याचा कारखाना) काम करताना झालेल्या अपघातात दोन्ही हात गमवावे लागले होते. त्यावेळी तो फक्त 8 वर्षांचा होता. या घटनेनंतर मी आपल्या कामासाठी कोणावरही अवलंबून राहणार नाही, असे त्यांने सांगितले. या घटनेनंतर मला कोणीही मदत केली नाही. सरकारनेही नाही; पण माझे कुटुंब माझ्यासोबत होते. यानंतर 2013 पासून आमिरने पॅरा क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT