Latest

गुजरात निवडणुकीपूर्वी काॅंग्रेसला बसणार मोठा धक्का, १० आमदार भाजपच्या वाटेवर

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काॅंग्रेस मोठा झटका मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सल्लागाराने असा दावा केला आहे की, भाजप गुजरातमध्ये काॅंग्रेसच्या आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. या गोष्टीची माहिती काॅंग्रेस नेतृत्वाला देण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

सिरोही मतदारसंघातून आमदार संयम लोढा यांनी शुक्रवारी ट्विट केले होते. ज्यामध्ये काॅंग्रेसला सतर्क राहण्यास सांगितले आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात की, "गुजरात विधानसभा निवडणूक २०२२, भाजप काॅंग्रेसच्या १० आमदारांना फोडण्याच्या प्रयत्नात आहे. स्वस्थ रहा आणि सतर्क रहा", असं ट्विट करत त्यांनी काॅंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनाही टॅग केले होते.

लोढा म्हणाले की, "मी काॅंग्रेसला सतर्क केले आहे. मला याविषयी माहिती मिळाली आहे, त्यामुळे मी काॅंग्रेसला माहिती दिली आहे. मी रघू शर्मा यांना २० दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही, म्हणून मी पक्षाला सतर्क करण्यासाठी पक्षाच्या उच्च नेत्यांना टॅग केले. जर तुम्ही झोपेत असाल, तर असे प्रकार होणे सहाजिकच आहे. आपण भाजपाच्या विरोधात आहे. त्यामुळे चिंता जाहीर आपली जबाबदारी आहे."

गुजरातमध्ये २०२० साली राज्यसभा निवडणुकीपूर्वीही काॅंग्रेसच्या ८ आमदारांनी राजीनामा दिला होता. नंतर भाजपाने गोठात सामील झाले. काॅंग्रेसच्या ५ आमदारांनी नुकतीच पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपाचा पदर पकडला आहे. सध्या राज्यात काॅंग्रेसच्या आमदारांची संख्या ६५ आहे.

पहा व्हिडिओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा

SCROLL FOR NEXT