Latest

omicron patient : ओमायक्रॉनचे 99 टक्के रुग्ण केवळ सात दिवसांत बरे

backup backup
नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या धास्तीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. (omicron patient) देशातील 99 टक्के ओमायक्रॉनबाधित केवळ सात दिवसांत बरे झाले आहेत. त्यांच्यामध्ये कोरोनाची अतिशय सौम्य लक्षणे दिसून आली आहेत.
दिल्ली येथील लोकनायक हॉस्पिटलमधील संशोधन अहवालातून ही माहिती समोर आला आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट अत्यंत वेगाने पसरतो.
मात्र, डेल्टाच्या तुलनेत शरीरातून लवकर निघून जातो. डेल्टा ची लागण झालेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी 7 ते 10 दिवस लागतात. तर काही रुग्णांना महिनाभराचा देखील कालावधी लागतो.
मात्र, ओमायक्रॉनच्या बाबतीत 92 टक्के रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी आठवड्यात निगेटिव्ह येत आहे.

omicron patient : लसीकरणामुळे मृत्यूदरात घट

ओमायक्रॉन विषाणूमुळे जीवितहानी कमी होत असल्याचे निष्कर्ष जगभरातील आकडेवारीतून समोर आले आहे.
मागील पंधरा दिवसांतील रुग्णसंख्या वाढ आणि मृत्यू दर पाहता महाराष्ट्राचाही मृत्यू दर कमी असल्याचे दिसून येते.
मृत्यूदर कमी होण्यात लसीकरणाचाही मोठा हातभार आहे.
राज्यात जवळपास 85 टक्के नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. तर, 60 टक्क्यांहून अधिक नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे.
पहिल्या दोन लाटा व राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याने समूह प्रतिकारकशक्ती तयार झाल्याने बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित अथवा सौम्य लक्षणातूनच बरे होताना दिसत आहेत.
विविध इतिहासाचा आजार असलेले, वेगवेगळ्या कारणांनी कमी प्रतिकारकशक्ती असलेले आणि ज्येष्ठ नागरिक आदींनाच ओमायक्रॉनचा धोका राहील, असे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी स्पष्ट केले आहे.
SCROLL FOR NEXT