Latest

गुजरातमध्‍ये मोठी दुर्घटना : भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू, १२ जखमी

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. अहमदाबादमधील सरखेज-गांधीनगर (एसजी) महामार्गावरील इस्कॉन मंदिराजवळील उड्डाणपुलावर आज (दि.२०) झालेल्या अपघातात नऊ जण ठार झाले. तर १२ जण जखमी झाले आहेत. आज पहाटे एकच्या सुमारास हा अपघात झाला.

माहितीनुसार आज (दि.२०) पहाटे अहमदाबादमधील सरखेज-गांधीनगर (एसजी) महामार्गावरील इस्कॉन मंदिराजवळील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२ जखमी झाले आहेत, अशी माहिती सोला सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी कृपा पटेल यांनी दिली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT