मुंबई ; पुढारी वृत्तसेवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील परतीच्या पावसाने हात दिल्याने राज्यातील सरासरी पावसाचे प्रमाण ८६ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. मात्र, कोकण विभाग वगळता राज्यातील उर्वरित सर्व विभागातील पावसाची टक्केवारी शंभरहून कमीच आहे. विशेषतः पुणे आणि नाशिक विभागाची स्थिती मात्र गंभीर असल्याचे चित्र आहे.
कोकण विभागात ११ सप्टेंबर अखेरपर्यंत १०१.१४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ विदर्भ विभागात ९४.१५ टक्के पाऊस आणि अमरावती विभागात ८६.११ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर, औरंगाबाद विभागात ७९.२८ पाऊस झाला आहे. दुसरीकडे नाशिक आणि पुणे विभागात सर्वात कमी पाऊस झाला आहे. नाशिक विभागात ६५.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर, पुणे विभागात केवळ ५८.९ टक्के पावसाची नोंद असून, राज्यातील सर्वात कमी पाऊस या विभागात झाला आहे.
हेही वाचा :