Latest

कर्नाटक : तुमकूरमध्ये भीषण अपघात; बस पलटून ८ ठार, २० जखमी, मृतांमध्ये ६ विद्यार्थी

मोनिका क्षीरसागर

तुमकूर (कर्नाटक) : पुढारी वृत्तसेवा

येथील पालावल्ली तलावाजवळ शनिवारी (दि.१९) बस पलटून भीषण अपघात झाला.  या दुर्घटनेत ८ प्रवासी जागीच ठार झाले, तर २५ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असून, काही प्रवासी बसमध्ये अडकलेल्या अवस्थेत असल्याचे समजते.

तुमकूर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बसमध्‍ये १०० हून अधिक प्रवासी हाेते. होसपेटे शहरातून पावगडकडे जाणार्‍या बसच्‍या छतावरही प्रवासी बसले हाेते. यावेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस दुभाजकाला धडकली. ही धडक एवढी भीषण हाेती की, बस पलटी  झाली. ६ विद्यार्थ्यांसह ८ जण जागीच ठार झाले. २० हून अधिक जण जखमी झाले. त्‍यांना पावगड रुग्णालयात दाखल केले आहे. तुमकूर पोलिस प्रमुख राहुल कुमार यांनी अपघातस्‍थळी पाहणी केली. अपघातात गंभीर जखमींची संख्‍या अधिक असल्‍याने मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीतीही तुमकूर पाेलिसांनी व्‍यक्‍त केली आहे.

हेही वाचलत का ?

SCROLL FOR NEXT