Latest

भारतीय वंशाच्या डॉक्टरचा ब्रिटनमध्ये कारनामा; ३५ वर्षात तब्बल ४८ महिला रुग्णांचे लैंगिक शोषण

अमृता चौगुले

लंडन; पुढारी ऑनलाईन : ब्रिटनमधील एका न्यायालयाने गुरुवारी ७२ वर्षीय भारतीय वंशाच्या डॉक्टरला ४८ महिला रुग्णांविरुद्ध लैंगिक (Sexual exploitation) गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आहे. हे लैंगिक गुन्हे ३५ वर्षांच्या कालावधीत घडले आहेत. या आरोपी डॉक्टरचे नाव कृष्णा सिंह असे असून तो स्कॉटलंडमध्ये प्रॅक्टिस करत होता.

या डॉक्टरवर (Sexual exploitation) चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, चुंबन घेणे, अयोग्य पद्धतीने तपासणी करणे शिवाय अश्लिल पद्धतीने शेरेबाजी करणे अशा प्रकारचे आरोप ग्लासगो येथील उच्च न्यायालयात चालू असणाऱ्या घटल्यामध्ये करण्यात आले होते. दरम्यान हे सर्व आरोप या डॉक्टरने नाकारले होते.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहिती नुसार, या घटल्या दरम्यान या ७२ वर्षांच्या डॉक्टरने त्याच्यावर करण्यात आलेले फेटाळत या रुग्णांनी माझ्यावर केलेले आरोप धादांत खोटे असल्याचा दावा केला. मी भारतात असताना तिथे ज्या प्रमाणे रुग्णांचे परिक्षण करण्याचे ट्रेनिंग दिले त्याच पद्धतीने मी माझ्या रुग्णांचे वैद्यकीय परिक्षण केले आहे.

नॉर्थ लॅनार्कशायरमध्ये प्रॅक्टिस करताना फेब्रुवारी १९८३ ते मे २०१८ या कालावधीत डॉक्टराचा गुन्ह्यांमध्ये भाग घेतल्याचा आरोप आहे.तो या काळात उत्तर लॅनार्कशायरमध्ये आपला दवाखाना चालवत होता. तो जेव्हा आपत्कालीन विभागात कार्यरत होता किंवा रुग्णांच्या घरी दिलेल्या भेटीदरम्यान तसेच पोलिस ठाण्यात असताना देखील त्याने अशा पद्धतीचे कृत्य केल्याचे अहवालात म्हटले आहे.

फिर्यादी अँजेला ग्रे यांनी न्यायालयाला सांगितले, की डॉ. सिंग हा नियमितपणे महिलांना त्रास देत असे. कधी कधी तो कमी अधिक प्रमाणात कधी स्पष्टपणे तर कधी अप्रत्यक्षरित्या महिला रुग्णांशी असभ्य वर्तन करत होता. लैगिंक अत्याचार हा त्याचा कामाचा व दैनंदिन जीवनाचाच भाग असल्याचे अँजेला ग्रे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

डॉ. सिंग याला समाजातील एक प्रतिष्ठित आणि आदरणीय व्यक्ती म्हणून समजले जाते. तसेच त्याने वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या सेवेबद्दल त्याला ब्रिटिश राजघराण्याचा रॉयल मेंबर ऑफ द ऑर्डर ब्रिटीश एम्पायर ऑनर ने सन्मानित करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT