Latest

चीनमध्ये ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, दिल्ली-एनसीआरमध्येही जाणवले भूकंपाचे धक्‍के

निलेश पोतदार

नवी दिल्‍ली ; पुढारी वृत्‍तसेवा चीनमध्ये सोमवारी रात्री उशिरा जोरदार भूकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 इतकी मोजली गेली. भूकंप इतका जोरदार होता की त्याचे धक्के दिल्ली-एनसीआरमध्येही जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-चीन सीमेजवळ असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचे हे धक्के इतके जोरदार होते की अनेक भागातील लोक घाबरून घराबाहेर पडले.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, "भूकंपाचा केंद्रबिंदू चीनच्या दक्षिणेकडील शिनजियांगमध्ये होता. भूकंपाची तीव्रता 7.2 होती. अक्षांश 40.96 आणि लांबी 78.30, खोली: 80 किमी होती."

चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने सांगितले की, मंगळवारी पहाटे चीनच्या पश्चिम शिनजियांग प्रदेशातील दुर्गम भागात ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. स्थानिक वेळेनुसार पहाटे दोनच्या सुमारास अक्सू प्रांतातील वुशू काउंटीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर अनेक वेळा आफ्टरशॉक जाणवले. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 पर्यंत मोजली गेली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT