Latest

CBI Workers : सीबीआयच्या कार्यालयात ६८ कर्मचारी पॉझिटिव्ह

backup backup

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सीबीआयच्या मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील कार्यालयात शनिवारी 68 कार्यालयीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. कार्यालयात काम करणार्‍या 235 लोकांना चाचणी करण्यास सांगितले होते. 235 पैकी 68 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. करोनाबाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. (CBI Workers)

याआधी शुक्रवारी एकाच दिवसात मुंबई पोलिसांच्या किमान 93 कर्मचार्‍यांना कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळून आले होते. या प्रकरणांमुळे, मुंबई पोलीस विभागातील संक्रमितांची संख्या 9,657 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये 125 जवानांचा समावेश आहे.

सध्या 409 बाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 48 तासांत करोनाग्रस्त दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

CBI Workers : पोलिस उपनिरीक्षकाचे कोरोनाने निधन

कोरोनाची बाधा झालेल्या 57 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. तसेच मोटर परिवहन विभागात कार्यरत पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक महेंद्र भाटी यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या 125 वर पोहोचली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT