Latest

काळजी घ्या ! पुणे शहरात आय फ्लूचे 6000 रुग्ण

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरात सध्या व्हायरल इन्फेक्शनसह 'आय फ्लू'ची साथ पसरत आहे. आरोग्य विभागाकडून शाळांमध्ये, महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये सर्वेक्षण आणि तपासणी केली जात आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, येरवडा-कळस धानोरी परिसरात 'आय फ्लू' च्या रुग्णांची संख्या सर्वाधिक 635 इतकी आहे. शहरात एकूण 5935 जणांमध्ये 'आय फ्लू' आढळून आला आहे. शहरात आतापर्यंत 193 शाळांमध्ये डोळे तपासणी अभियान राबवण्यात आले आहे. यामध्ये 44 हजार 996 मुलांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1352 मुलांमध्ये आय फ्लूचे निदान झाले आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये बाह्य रुग्ण विभागात 4583 रुग्णांमध्ये डोळयांचा साथीचा प्रादूर्भाव झाला आहे.

'आय फ्लू' अर्थात 'कंजंक्टिवायटिस' हा संसर्ग प्रामुख्याने वातावरणामध्ये बदल झाल्याने आणि सूक्ष्म जीवाणूंमुळे फैलावतो. डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे हेही यामागील मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत. डोळे दुखणे, चुरचुरणे, लाल होणे, डोळ्यांची आग होण्याचा त्रास जाणवणे या पार्श्वभूमीवर शारीरिक आरोग्यासह डोळ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT