Latest

जिओ टू 5G आता कोल्हापूर आणि सांगलीमध्ये

सोनाली जाधव

 मुंबई : कोल्हापूर आणि सांगली शहर आज जिओ टू 5G नेटवर्क शी जोडले गेले. याच वेळी १७ राज्यातील ५० शहरांमध्ये एकाच दिवशी 5G लाँच करून जिओ ने एकप्रकारे विश्वविक्रम केला, असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे. आजपासून, जिओ वेलकम ऑफर सांगली कोल्हापूर सह महाराष्ट्रातील नांदेड येथेही सुरू झाली, असे कंपनीने कळविले आहे.

कोल्हापूर आणि सांगली शहरात 5G सेवा सुरू करणारा जिओ हा पहिलाच ऑपरेटर

ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 1 Gbps+ वेगाने अमर्यादित डेटा मिळेल. कोल्हापूर आणि सांगलीशिवाय महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर आणी अहमदनगर येथे जिओ 5G सेवा सुरू करण्यात आली आहे, असे कंपनीने म्हटले आहे. जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोल्हापूर आणि सांगली शहरात 5G सेवा सुरू करणारा जिओ हा पहिलाच ऑपरेटर आहे. आजपासून, शहरातील जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय, 1 Gbps+ पर्यंत स्पीडवर अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी जिओ वेलकम ऑफरसाठी आमंत्रित केले जाईल, असेही सांगण्यात आले. जिओ टू 5G सेवा ट्रू मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT