Latest

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये वीटभट्टी कोसळली; ५ मजुरांचा मृत्यू, ३ गंभीर जखमी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील रुरकी येथील मंगळूर कोतवालीच्या लहाबोली गावात वीटभट्टी कोसळल्याने विटांच्या ढिगाऱ्याखाली ६ हून अधिक मजूर गाडले गेले. आज (दि.२६) सकाळी ही घटना घडली. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

विटा भाजण्यासाठी चिमणीत विटा भरत असताना ही घटना घडली. मजूर काम करत असताना अचानक भिंत कोसळली. कोणाला काही समजण्यापूर्वीच भिंतीजवळ उभे असलेले मजून ढिगाऱ्याखाली गाडले गेले. जेसीबीच्या सहाय्याने विटांचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

मंगळूर पोलिस स्टेशनचे अधिकारी प्रदीप बिश्त यांनी सांगितले की, आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तीन मजुरांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तीन मजूर लहाबोली गावातील, एक मजूर मुझफ्फरनगरचा तर दुसरा स्थानिकचा आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT