Latest

Kolhapur Omicron : कोल्हापुरात ओमायक्राॅनचे आणखी नवे ४ रुग्ण

backup backup

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्राॅनचे रुग्ण आढळत आहेत. अशात कोल्हापुरमध्येही ओमायक्राॅनचे नवे ४ रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये कळंब्यातील १, नागाळा पार्कातील १, गडहिंग्लज येथील २ असे एकूण ४ ओमायक्राॅनचे रुग्ण आहेत. यामध्ये ओमायक्राॅनबाधित एक डाॅक्टरदेखील आहेत. (Kolhapur Omicron)

कोल्हापूर शहरात ओमायक्रॉनने वेग पकडला असून कालच (४ जानेवारी) ३ बाधितांची भर पडली होती. शहरातील सुर्वेनगर, नागाळा पार्कसह शहरातील अन्य एका परिसरातील रूग्णांचा यामध्ये समावेश आहे. नागाळा पार्क येथील त्या ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रूग्णाची मुलगी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात परवा (३ जानेवारी) एक ओमायक्रॉन बाधित सापडला होता. हा रुग्ण ५७ वर्षीय पुरुष असून तो नागाळा पार्क परिसरातील रहिवाशी आहे. त्याने कोणताही प्रवास केलेला नाही. एका कार्यक्रम सोहळ्यासाठी त्यांची मुलगी गोव्याहून आली आहे. यातून त्यांना लागण झाली असल्याची शक्यता आरोग्य प्रशासनाने व्यक्त केली आहे.

तसेच संबंधित व्यक्ती एका कार्यक्रम सोहळ्यासाठी गेले होते. तेथे त्यांना ओमायक्रॉनची लागणी झाली असल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हा दुसरा रुग्ण आहे. पहिल्या ओमायक्रॉनबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. (Kolhapur Omicron)

दरम्यान, अवघ्या आठवड्यात कोरोना उपचार घेणार्‍या रुग्णांच्या संख्येने देशात १ लाखाचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रात या रुग्णसंख्येची ४० हजारांकडे वाटचाल सुरू झाली आहे आणि कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा एकदा शंभरी गाठली आहे.

SCROLL FOR NEXT