Latest

Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिरात पुजाऱ्यांच्या २० जागांसाठी तब्बल ‘इतके’ अर्ज

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील श्री राम मंदिरात पुजाऱ्यांच्या २० जागा भरायच्या आहेत. पण या जागांसाठी ३ हजार अर्ज आलेले आहेत. अर्जदारांची मुलाखत घेऊन या जागेवर भरती होणार आहे. या २० पैकी २०० अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. Ram Mandir

पात्र अर्जदारांची केशवपुरम येथे मुलाखत घेतली जाईल, यासाठी वृदांवन येथील पुजारी जयकांत मिश्रा, अयोध्येतील महंत मिथिलेश शरण आणि सत्यनायारण दास या तिघांची समिती स्थापन्यात आलेली आहे. निवड झालेल्या २० उमेदवारांना ६ महिने प्रशिक्षण दिले जाईल. ज्या उमेदवारांची निवड झालेली नाही, तेसुद्धा प्रशिक्षणात सहभागी होऊ शकणार आहेत. त्यांना प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

पुढील काळात नव्या संधी उपलब्ध झाल्यानंतर या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे खजानिस गोविंद देव गिरी यांनी दिली आहे. मुलाखत घेताना संध्या वंदन, रामाच्या पूजेतील विविध विधी असे प्रश्न विचारण्यात आले. Ram Mandir

प्रशिक्षणासाठी विशेष अभ्यासक्रम बनवण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम ज्येष्ठ धर्मगुरुंनी बनवला आहे. प्रशिक्षण काळात उमेदवारांना मोफत जेवण, राहाण्याची व्यवस्था आणि मासिक २ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT