Latest

नाशिकमध्ये ३१५ उमेदवारांनी दिली एमपीएससी मेन्स

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) तर्फे घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेमध्ये सोमवारी (दि. २२) तिसऱ्या दिवशी दोन्ही सत्रांत ३१५ उमेदवारांनी पेपर दिला, तर ३३ उमेदवार अनुपस्थित होते. तिन्ही दिवसांत सहा सत्रांत झालेले पेपर सुरळीत पार पडल्याने प्रशासनाकडून सुटकेचा नि:श्वास सोडण्यात आला.

एमपीएससीतर्फे तीन दिवसांपासून मुख्य परीक्षा घेण्यात आली. उपजिल्हाधिकारी, डीवायएसपीसह शासन सेवेतील विविध पदांसाठी तीन दिवसांमध्ये सहा पेपर घेण्यात आले. नाशिक जिल्ह्यातून एकूण ३४८ उमेदवार प्रविष्ट होते. सीबीएस येथील बिटको हायस्कूलच्या केंद्रांत सोमवारच्या दोन्ही सत्रांत सामान्य अध्ययनचा पेपर घेण्यात आला. दोन्ही सत्रांत एकूण उमेदवारांमधून ३१५ जणांनी पेपर सोडविला. परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक केंद्रप्रमुख व २० सुपरवायझर यांची तीन दिवसांपासून नियुक्ती केली होती. तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस विभागही सतर्क होता. दरम्यान, तीन दिवसांमध्ये सहा पेपर सोडविल्यानंतर उमेदवारांना आता निकालाची प्रतीक्षा असणार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT