Latest

वाशिम : ट्रॅव्हल-टँकरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ३ ठार, ८ जखमी

backup backup

वाशिम ; पुढारी वृत्तसेवा : वाशिम शहरालगत अकोला नाका परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला. पुण्यावरून यवतमाळ जाणाऱ्या खासगी बस आणि पाण्याच्या टँकरची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भयंकर होता टँकरमधील चालक आणि क्लीनर जागीच ठार झाले.  टँकरमधील एक गंभीर जखमी आहे.

खासग बसमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. बसमधील ७ जण जखमी झाले. दरम्यान जखमींना वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT