Latest

Poverty : ३ कोटी गरीब लोकांना पक्की घरे देऊन लखपती बनवले : पंतप्रधान मोदी

backup backup

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : अर्थसंकल्प २०२२ या विषयावर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यात सरकारच्या कामगिरीबाबत मोदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, " देशातील ३ कोटी गरीबी (Poverty) लोकांना पक्की घरे देऊन त्यांना लखपती बनवले आहे. नळाचे पाणी ९ कोटींपेक्षा जास्त नळजोडण्या दिला आहेत. ".

"गेल्या ७ वर्षात आपल्या सरकारने ३ कोटी गरीबांना (Poverty) पक्की घरे देऊन त्यांना लखपती बनवले आहे. आता नळाचे पाणी जवळपास ९ कोटी ग्रामीण घरांपर्यंत पोहोचू लागले आहे. यापैकी गेल्या दोन वर्षांत जलजीवन अभियानांतर्गत ५ कोटींहून अधिक नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. यावर्षी सुमारे ४ कोटी ग्रामीण कुटुंबांना नळजोडणी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे", अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

"देश मागील १०० वर्षात आलेल्या सर्वात मोठ्या महामारीशी लढत आहे. कोरोना व्हायरस या महामारी जगासमोर अनेक आव्हानं घेऊन आली. यापुढे आपण जे जग पाहणार आहोत ते तसं नसणार जसं आपण कोरोना महामारीपूर्वी पाहत होतो", असेही त्‍यांनी नमूद केले.

"कोरोनानंतर एक नवीन वर्ल्ड ऑर्डर बनणार आहे. त्याचे संकेतही दिसत आहे. आज भारताकडे पाहण्याचा जगाच्या दृष्टीकोनात मोठा बदल झाला आहे. आता जगातील लोकं भारताकडे अधिक मजबूत रुपाने पाहत आहे. त्यासाठी आपल्या देशाला वेगाने पुढे नेणं आपल्यासाठी गरजेचे आहे. हा काळ नव्या संधी आणि नव्या संकल्पना यांना पुढे घेऊन जाणारा आहे", असं मत पंतप्रधान मोदींना यावेळी मांडलं.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT