Latest

सातारा : कण्हेर धरणातून २१९२ क्युसेस पाण्याचा विसर्ग

अनुराधा कोरवी

कण्हेर : पुढारी वृत्तसेवा : सातारच्या पश्चिमेकडे असलेल्या कण्हेर धरण परिसरामध्ये गेल्या सहा दिवसापासून पावसाची संततधार चालू आहे. तसेच धरणाच्या पश्चिमेकडे असलेल्या महाबळेश्वर-मेढा भागात पर्जन्यवृष्टी चांगली झाल्याने धरणामध्ये पाण्याची आवक प्रती तास २८६७ क्युसेक्स होत आहे. सध्या धरण ६४.७८टक्के भरले आहे. यामुळे धरणाची पाणीपातळी निर्धारित ठेवण्यासाठी धरणाच्या चारीही वक्र दरवाज्यातून २१९२ क्युसेक्स पाणी सांडव्यावरून वेण्णा नदीपात्रात सोडण्यात आली आहे.

कण्हेर परिसरात गेल्या सोमवारपासून दमदार पाऊस पडल्याने धरणात ६.५४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणातील एकूण साठा हा १८५.५७ दलघमी इतका असून धरणाच्या पाणी पातळी ६८४.६४ मीटरने वाढ झाली आहे. तर यंदाच्या मान्सूनमधील १ जूनपासून धरण क्षेत्रात ३४१ मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान सोमवारी सकाळी सायरन वाजवून सुमारे १०.३० वाजता धरणाचे चारही दरवाजे ०.४० मीटरने उचलून २१९२ क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे वेण्णा नदी संथ गतीने वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT