Latest

Miller’s Girl : २१ वर्षांची जेना ओर्टेगा, ५२ वर्षांचा मार्टिन फ्रीमन यांच्यातील इंटिमेट सीन व्हायरल, संतापलेल्या नेटकऱ्यांनी …

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जेना ओर्टेगाच्या 'मिलर्स गर्ल' या नव्या सिनेमाबद्दल नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. (Miller's Girl ) चित्रपटातील एक लव्ह सीन पाहून लोक नाराज झाले. २१ वर्षांची जेना ओर्टेगा आणि तिचा सहकलाकार मार्टिन फ्रीमन, जो ५२ वर्षांचा आहे, या दृश्यात होते. सोशल मीडियावर हा सीन व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांची खरडपट्टी काढली. दोघांमध्ये ३१ वर्षांचा फरक आहे. या मोठ्या फरकामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. (Miller's Girl )

संबंधित बातम्या –

बालकलाकार म्हणून आपले करिअर सुरू करणारी अभिनेत्री जेना ओर्टेगा यावेळी मार्टिन फ्रीमॅन सोबत चित्रपट 'मिलर्स गर्ल'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील सीनमुळे खूप टीका होत आहे. हा चित्रपट जानेवारीमध्ये चित्रपटगृहात रिलीज झाला होता. मीक्षकांनी यास नापसंती दर्शवली. आता सोशल मीडियावर देखील युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. या चित्रपटामध्ये एका विद्यार्थिनी जेनासोबत ५२ वर्षाच्या मार्टिनशी लव्ह सीन दिसत आहेत. दोघांमध्ये काही इंटीमेट सीन देखील आहेत.

जेना ओर्टेगा नेटफ्लिक्सची सीरीज 'वेडनेसडे' खूप लोकप्रिय ठरली होती. प्रेक्षकांकडूनही या सारीजला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

'मिलर्स गर्ल' मध्ये जेना १८ वर्षांची विद्यार्थीनी दाखवण्यात आली आहे. तर ५२ वर्षांचे मार्टिन फ्रीमॅन शिक्षकाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कहाणी दोघांच्या रिलेशनशिपवर आधारित आहे.

SCROLL FOR NEXT