Latest

नांदेड लोकसभेसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 20.85 टक्‍के मतदान

निलेश पोतदार

नांदेड : पुढारी वृत्‍तसेवा नांदेड लोकसभेसाठी आज 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 वाजल्‍यापासून मतदानाला सुरुवात झाली. नांदेड लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 20.85 टक्‍के मतदान झाले आहे.

आज शुक्रवार 26 एप्रिल रोजी नांदेड लोकसभेसाठी 18 लाख 51 हजार 843 मतदार आपला मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. यात 9 लाख 55 हजार 84 पुरुष तर 8 लाख 96 हजार 617 महिला तर 142 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. नांदेड शहरी व ग्रामीण भागात सकाळपासून मतदान उत्‍साहात सुरु झाले असून, अनेक बुथवर मतदारांच्‍या रांगा दिसून येत आहेत. यात वयोवृध्‍द, नवमतदार व सर्व गटातील मतदारांचा समावेश आहे.

नांदेड लोकसभेसाठी नांदेड दक्षिण मतदार संघामध्‍ये सकाळी 11 वाजेपर्यत सर्वाधिक 22.50 टक्‍के तर सर्वात कमी मुखेड मतदार संघात 18.74 टक्‍के मतदान झाले आहे. भोकर 21.81 टक्‍के, नांदेड उत्‍तर 20.22 टक्‍के, नांदेड दक्षिण 22.50 टक्‍के तर नायगाव 22.13 टक्‍के आणि देगलूर 19.74 टक्‍के, मुखेड 18.74 टक्‍के असे एकूण 20.85 टक्‍के मतदान झाले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT