Latest

Sikkim: मुसळधार पाऊस, पुरामुळे २ हजार पर्यटक अडकले

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे चुंगथांग जवळील रस्ता वाहून गेला. त्यामुळे 2000 हून अधिक पर्यटक उत्तर सिक्कीममध्ये (Sikkim) अडकले. पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी बीआरओ प्रोजेक्ट स्वस्तिकने प्रभावित क्षेत्रामध्ये तात्पुरती क्रॉसिंग बांधण्यासाठी काम सुरू केले आहे.

पीआरओ महेंद्र रावत यांनी सांगितले की, आज (दि.१७) दुपारी 12 वाजेपर्यंत 300 हून अधिक पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. रस्ता पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर पर्यटकांचे स्थलांतर सुरूच राहणार आहे.

Sikkim : भूस्खलनामुळे बसेस प्रभावित

सिक्कीम पोलिसांनी सांगितले की, भूस्खलनामुळे बाधित झालेल्या दोन बसमधून आतापर्यंत एकूण 72 पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. गंगटोकसाठी 19 पुरुष, 15 महिला आणि 4 मुले असलेली पहिली बस मंगन जिल्ह्यातील पेगोंग येथे अडकली होती.

उत्तर सिक्कीम जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे पेगोंगमध्ये राष्ट्रीय महामार्ग-10 पाण्याखाली गेला आहे. गुरुवारी रात्री उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील नद्यांना अचानक पूर आला. या पुरामुळे उत्तर सिक्कीममधील लाचेन आणि लाचुंग या भागांचा राज्याच्या इतर भागांपासून संपर्क तुटला आहे. या पुरामुळे महामार्ग तसेच पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची वाहतूक करणे असुरक्षित झाले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT