Junagadh Voilence: अवैध प्रार्थनास्थळावर कारवाई करताना दगडफेक, एकाचा मृत्यू, ४ पोलीस जखमी

Junagadh Voilence: अवैध प्रार्थनास्थळावर कारवाई करताना दगडफेक, एकाचा मृत्यू, ४ पोलीस जखमी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातच्या जुनागढमधील (Junagadh Voilence) बेकायदेशीर प्रार्थनास्थळ हटवण्याच्या नोटीसवरून शुक्रवारी (दि.१६) रात्री हिंसाचार उसळला. प्रार्थनास्थळासमोर जमलेल्या शेकडो लोकांनी घोषणाबाजी करत दगडफेक केली. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला. त्याचवेळी डेप्युटी एसपीसह चार पोलीस जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दंगलखोरांना प्रार्थनास्थळाबाहेर अटक केली असून पोलिसांनी त्यांना बेल्टने मारहाण केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शहरात (Junagadh Voilence) सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरभर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जुनागडचे एसपी रवी शेट्टी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, माजेवाडी रोडजवळ एका रस्त्यावर एक प्रार्थनास्थळ आहे. ती काढण्यासाठी महापालिकेने पाच दिवसांपूर्वी नोटीस दिली होती, या नोटिशीला विरोध करत सुमारे 500 लोकांनी एकत्र येत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.

Junagadh Voilence : पोलिस कर्मचारीही जखमी झाले

पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तासाभराहून अधिक वेळ आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान कोणीतरी दगडफेक सुरू केली. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. दगडफेकीत पोलीस कर्मचारीही जखमी झाले. डीएसपी हितेश आणि तीन कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत. तर दोन पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत.

संशयित आरोपींना पोलीस कोठडी

पोलिसांनी 174 आरोपी आणि संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे. उर्वरित आरोपींनाही लवकरच पकडण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news