Latest

भारत-न्यूझीलंड सामना: धमकीच्या पोस्टप्रकरणी लातूरच्या तरूणाला अटक

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज (दि. १५) भारत-न्यूझीलंड संघामध्ये होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यादरम्यान अनुचित प्रकार घडवून आणण्याची धमकी देणारी पोस्ट एक्सवरून टाकण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने लातूर जिल्ह्यातील एका १७ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याने धमकीचा संदेश का पोस्ट केला आहे, याबाबत अद्याप काही समजू शकलेले नाही. (India vs NZ at Wankhede)

धमकीच्या य पोस्टनंतर मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियमवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच स्टेडियमच्या आसपासच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे, असे मुंबई पोलिसांनी बुधवारी सांगितले. मुंबई पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, क्रिकेट विश्वचषक क्रिकेट विश्वचषकाच्या आज होणार्‍या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान अनुचित घटना घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. (India vs NZ at Wankhede)

तरुणाने पोस्टमध्ये मुंबई पोलिसांना टॅग करून बंदूक, हँडग्रेनेड आणि गोळ्या दाखवल्या आहेत. यानंतर मुंबई पोलिसांनी स्टेडियमच्या आजूबाजूच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. या प्रकरणी लातूर जिल्ह्यातील एका १७ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT