Latest

उत्तर महाराष्ट्रातील गारपिटग्रस्तांना १४४ कोटींची भरपाई, अशी मिळणार मदत

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– उत्तर महाराष्ट्रात गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या अखेरच्या टप्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने द्राक्ष, कांदा, कापूस, केळी यासह विविध पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी १४४ कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध झाले आहे. महसुल प्रशासनातर्फे शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येत आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा पिकांना बसला होता. विभागातील पाचही जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार तब्बल ५५ हजार ८५८ हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्यात गेली. त्यामध्ये भात, भाजीपाला, टोमॅटो, मका, सोयाबीनसह अन्य फळपिकांचे समावेश होता. त्यामुळे एकुण १ लाख ७ हजार ४९१ शेतकरी बाधित झाले. विभागामध्ये अवकाळीचा सर्वाधिक फटका नाशिकला बसला. जिल्ह्यातील ३४ हजार ९५२ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली. धुळ्यात २९३.६१ हेक्टर पिकांची नासाडी झाली. पाचही जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून १४४ कोटी १० लाख ६६ हजार रुपयांचे अनुदानाची मागणी करण्यात आली होती.

केवायसी अपडेट करावे

अनुदानासाठी बहुतांक्ष जणांचे केवायसी अपडेट नसल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यातील बाधितांपैकी जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांचे केवायसी नसल्याचे समजते आहे. परिणामी अनुदान वर्ग करण्यास अनेक अडचणी येत आहे. शेतकऱ्यांनी तातडीने केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

**जिल्हाबाधित क्षेत्र (हे)शेतकरीअनुदान (लाखात)**
नाशिक34952.0365849978.60
नगर11956.93216832837.35
धुळे293.6173279.19
नंदुरबार2851.315756495.43
जळगाव5803.89134711020.09
SCROLL FOR NEXT