Latest

Abhishek Ghosalkar case : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात अमरेंद्र मिश्राला न्यायालयीन कोठडी

अनुराधा कोरवी

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी मॉरिस नरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याची मंगळवारी न्यायालयाने 27 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या कटातून मिश्राला फायदा झाला आहे का, याचीही चौकशी करीत असल्याचे सांगून सुनावणी वेळी सरकारी वकिलांनी मिश्राच्या पोलीस कोठडीत वाढ मागितली. ( Abhishek Ghosalkar case )

संबंधित बातम्या 

आरोपीने सर्व माहिती पोलिसांना दिली असून पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद मिश्राच्या वतीने अ‍ॅड. शंभू झा यांनी केला. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर महानगर दंडाधिकारी लक्ष्मीकांत पाढेन यांनी मिश्राची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ( Abhishek Ghosalkar case )

SCROLL FOR NEXT